Covid special ukhane for grooms

कोविड चे रान सध्या सर्वत्र पसरले
xxxxच्या सहवासात जीवन माझे सुखावले॥
२)दूर क्षितिजावर,किलबिल सुरू पाखरांची ,
xxxx मुळे वाहील,
मंद झुळूक प्रेमाची॥
३)प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल,
xxxxच्या गोड smile ने,
घातली मला भूल॥
४)कोविडच्या काळात लग्न करायचे, केलय आम्ही daring,
xxxx बरोबर करतो आजपासून
life चे sharing॥
५)मनी आहे माझ्या, सुखी संसाराची आस,
xxxx, तू नेहमी अशीच,
मस्त हास॥
६)निळ्या आकाशात चमकतात तारे,
xxxxला घास देतोय
इकडे लक्ष द्या सारे॥
७)आकाशात उडतो पक्षांचा थवा,
   xxxxचे नांव घ्यायला,
   उखाणा कशाला हवा?
८)आकाशाच्या पोटात सामावले
   चंद्र सूर्य आणि तारांगणे,
  xxxxला घास देतो, तुमच्या     म्हणण्या प्रमाणे॥

Leave a comment